पांड्याच्या नेतृत्वात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया रंगणार सामना

ऑस्‍ट्रेलिया आणि भारत 'ए' यांच्यामध्ये मुंबईत तीन दिवसीय अभ्‍यास मॅच सुरु होणार आहे. ही मॅच दोन्ही संघासाठी महत्त्वाची आहे. ऑस्‍ट्रेलिया टीमला भारताच्या पिचचा अभ्यास करण्यास मदत होईल. तर भारत 'ए' टीमला प्रभावपूर्ण कामगिरी करण्याची संधी मिळणार आहे.

Updated: Feb 16, 2017, 09:23 PM IST
पांड्याच्या नेतृत्वात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया रंगणार सामना title=

मुंबई : ऑस्‍ट्रेलिया आणि भारत 'ए' यांच्यामध्ये मुंबईत तीन दिवसीय अभ्‍यास मॅच सुरु होणार आहे. ही मॅच दोन्ही संघासाठी महत्त्वाची आहे. ऑस्‍ट्रेलिया टीमला भारताच्या पिचचा अभ्यास करण्यास मदत होईल. तर भारत 'ए' टीमला प्रभावपूर्ण कामगिरी करण्याची संधी मिळणार आहे.

मॅचमध्ये भारत 'ए'चं कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे असणार आहे. कुलदीप यादववर देखील खास नजर असणार आहे. ऑस्‍ट्रेलिया विरोधातील टेस्ट सामन्यासाठी निवडला गेलेल्या हार्दिकने जर चांगली कामगिरी केली तर पुण्यात होणाऱ्या पहिल्या सामन्यात त्याला स्थान मिळू शकतं. हार्दिक शिवाय कुलदीप यादव याला देखील संधी मिळाली आहे.

मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाची टीम हे ठरवणार आहे की, त्यांना कोणत्या खेळाडूंना खेळवायचं आहे आणि कोणत्या खेळाडूंना आराम द्यायचा आहे.

दोन्ही संघातील खेळाडू 

ऑस्‍ट्रेलिया : स्टीव स्मिथ (कर्णधार), डेविड वार्नर, अशोक अगार, जॅकसन बर्ड, पीटर हैंडस्कांब, जोश हेजलवुड, उस्मान ख्वाजा, नाथन लियोन, मिशेल मार्श, शान मार्श, ग्लेन मैक्सवेल, स्टीफन ओकीफे, मैथ्यू रेनशा, मिशेल स्टार्क, मिशेल स्वीपसन, मैथ्यू वेड.

भारत 'ए' : हार्दिक पांड्या (कर्णधार), अखिल हर्वेडकर, प्रियांक पांचाळ, श्रेयस अय्यर, अंकित बवाने, ऋषभ पंत, ईशान किशन, शाहबाज नदीम, कृष्णप्पा गोथम, कुलदीप यादव, नवदीप सैनी, अशोक डिंडा, मोहम्मद सिराज, राहुल सिंह, बाबा इंद्रजीत.