'जर त्याने माझा रेकॉर्ड मोडला तर फेरारी गिफ्ट देणार'

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागला आज बीसीसीआयने फिरोजशहा कोटला स्टेडियमवर सन्मानित करण्यात आले. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा कसोटी सामना सुरु होण्यापूर्वी हा सोहळा पार पडला. यावेळी सेहवागसह त्याचे कुटुंबियही उपस्थित होते. 

Updated: Dec 3, 2015, 12:52 PM IST
'जर त्याने माझा रेकॉर्ड मोडला तर फेरारी गिफ्ट देणार' title=

नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागला आज बीसीसीआयने फिरोजशहा कोटला स्टेडियमवर सन्मानित करण्यात आले. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा कसोटी सामना सुरु होण्यापूर्वी हा सोहळा पार पडला. यावेळी सेहवागसह त्याचे कुटुंबियही उपस्थित होते. 

या सोहळ्यादरम्यान विरुने क्रिकेटमधील आठवणीही शेअर केल्या. तसेच पहिल्या टेस्टमधील शतक हे अविस्मरणीय असल्याचे सांगितले. यावेळी त्याने आपल्या मुलाला एक चँलेजही केले. कोणत्याही स्तरावरील क्रिकेटमध्ये विरुच्या मुलाने त्याचा ३१९ धावांचा रेकॉर्ड मोडला. तर आपल्या मुलाला फेरारी कार गिफ्ट करणार असल्याची घोषणाही त्याने यावेळी केली. 

तसेच कारकिर्दीदरम्यान सहकार्याबद्दल त्याने चाहत्यांचे आभारही मानले. तसेच चाहत्यांनी कायम भारतीय संघाच्या पाठिशी रहावे असेही तो यावेळी म्हणाला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.