नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ने गुरूवारी भारताच्या सर्वात यशस्वी सलामी फलंदाज वीरेंद्र सेहवाग याच्या क्रिकेटमधील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.
सेहवाग याने २० ऑक्टोबर क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. फिरोजशाह कोटला स्टेडिअममध्ये दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्या सुरू झालेल्या चौथ्या टेस्ट मॅचचा टॉस झाल्यानंतर सेहवाग आपल्या संपूर्ण परिवारासह आला होता. त्याच्या सोबत आई, दोन मुलं आणि पत्नी होती.
सेहवागला सन्मानित करण्यासाठी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट मंडळ (डीडीसीए)ने आंबेडकर स्टेडिअम एन्डचे नाव बदलून वीरू ३१९ एन्ड करण्यात आले आहे. हा बदल केवळ या सामन्यासाठी आहे.
सेहवागने भारतासाठी १५ वर्ष क्रिकेट खेळले. त्यात त्याने १०४ कसोटी खेळून ८५८६ रन्स बनविले. तसेच त्याने २५१ वनडे सामने खेळले त्यात त्याने ८२७३ रन्स बनिवले. सेहवागच्या नावावर टेस्टमध्ये २३ आणि वन डे मध्ये १५ शतक आहेत.
एक दिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक लगावणाऱ्या काही खेळाडूंमध्ये सेहवागचे नाव आहे. तसेच टेस्ट क्रिकेटमध्ये त्रिशतक लगावणाऱ्या चार खेळाडूंमध्ये सेहवागचे नाव आहे. आपल्या घरगुती मैदानावर सेहवाग याने केवळ तीन टेस्ट खेळले आहे. त्यात त्याची सरासरी ४०.२० ची आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.