सर्वात तेज आणि आक्रमक आहे यंदाचा वर्ल्ड कप

 याला टी-२०चा प्रभाव म्हणा किंवा अनुकूल खेळपट्ट्यांची कारनामा किंवा खेळाडूंची प्रतिभा... पण यंदाचा वर्ल्ड कप गेल्या कोणत्याही वर्ल्ड कपच्या तुलनेत आघाडीवर असल्याचे दिसत आहे. 

Updated: Mar 23, 2015, 04:58 PM IST
सर्वात तेज आणि आक्रमक आहे यंदाचा वर्ल्ड कप title=

मुंबई :  याला टी-२०चा प्रभाव म्हणा किंवा अनुकूल खेळपट्ट्यांची कारनामा किंवा खेळाडूंची प्रतिभा... पण यंदाचा वर्ल्ड कप गेल्या कोणत्याही वर्ल्ड कपच्या तुलनेत आघाडीवर असल्याचे दिसत आहे. 

यंदाचा वर्ल्ड कप गेल्या १० वर्ल्ड कपच्या तुलनेत सर्वाधिक धावा बनल्या आहेत. सर्वाधिक शतक लगावण्यात आले. सर्वाधिक वेळा संघांनी ३०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. 

आयसीसी वर्ल्ड कप २०१५ आता आपल्या अंतीम टप्प्यात पोहचला आहे. यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे स्टेडिअम बॅटने झालेल्या काही अविश्वसनीय रेकॉर्डचे साक्षीदार बनले आहेत. 

आपल्या कठोर आणि उसळणाऱ्या खेळपट्ट्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये फलंदाजांनी ज्या अंदाजात स्फोटक फलंदाजी केली आहे. त्याने क्रिकेटमध्ये रोमांचक युगाचा प्रवेश झाल्याचे स्पष्ट होत आहे. 

जगातील अंतीम चार संघात भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांनी आपले स्थान बनिवले आहे. 

वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत ४६ सामने झाले आहेत. या सामन्यात आतापर्यंत २२०२१ धावा बनविण्यात आल्या. ज्या आतापर्यंतच्या १० वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक आहे. 

दक्षिण आफ्रिकेत २००३मध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा एकूण धावांची संख्येने २० हजारांचा आकडा पार केला होता. त्या वर्षी वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक ५४ सामने झाले होते. 

तसा ३०० पेक्षा अधिक स्कोअर उभारणे नवीन गोष्ट नाही, १९७५ मध्ये चार वेळा ३०० पेक्षा अधिका धावा चार वेळा झाल्या होत्या. पण यंदा ३०० पेक्षा अधिक धावा करण्याचा नवा रेकॉर्ड संघांनी केला आहे. आतापर्यंत २७ खेळींमध्ये ३०० पेक्षा अधिक धावा करण्यात आल्या आहे. २०११ मध्ये केवळ १७ वेळा ही धावासंख्या ३०० पेक्षा अधिक गेली होती. 

वैयक्तिक स्कोअरच्या बाबतीत यंदा ३७ शतक लगावण्यात आले. गेल्या वर्ल्ड कपमध्ये २४ शतक लगावण्यात आले होते. तसेच वर्ल्ड कपमध्ये १८८ धावांचा १९ वर्षांपूर्वीचा गॅर कर्स्टन यांचा रेकॉर्ड तुटला आणि केवळ दोन द्विशतक झळकावण्यात आले. 

क्रिस गेल याने झिम्बाब्वे विरूद्ध २१५ धावांची खेळी करून गॅरी कर्स्टनचा रेकॉर्ड तोडला. तर न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टील याने वेस्ट इंडिजविरूद्ध क्वार्टर फायनल सामन्यात नाबाद २३७ धावांची खेळी करून नवा वर्ल्ड रेकॉर्ड केला. 

गेल्या पाच वर्ल्ड कपमधील रेकॉर्डवर एक नजर...
 
वर्ल्डकप-1999 : मॅच-42, रन-16719, विकेट-579, 300+स्कोअर (3), शतक-11
 
वर्ल्डकप-2003 : मॅच-54, रन-20441, विकेट-734, 300+स्कोअर (9), शतक-21
 
वर्ल्डकप-2007 : मॅच-51, रन-21333, विकेट-722, 300+स्कोअर (16), शतक-20
 
वर्ल्डकप-2011 : मॅच-49, रन-21333, विकेट-731, 300+स्कोअर (17), शतक-24
 
वर्ल्डकप-2015 (आतापर्यंत) : मॅच-46, रन-22021, विकेट-674, 300+स्कोअर (27), शतक-37

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.