'टेनिस सर्व्हिस'द्वारे कमतरता दूर करतोय सुरेश रैना

भारताचा मध्यम फळीतील भरवशाच्या फलंदाज सुरेश रैना आपल्यातील कमतरता दूर करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. यासाठी त्याने बराच वेळ नेटमध्ये घाम गाळला. उसळणाऱ्या चेंडूचा सामना करण्यासाठी तो 'टेनिस सर्व्हिस'चा मुकाबला करीत आहे. 

Updated: Mar 23, 2015, 04:18 PM IST
'टेनिस सर्व्हिस'द्वारे कमतरता दूर करतोय सुरेश रैना title=

सिडनी : भारताचा मध्यम फळीतील भरवशाच्या फलंदाज सुरेश रैना आपल्यातील कमतरता दूर करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. यासाठी त्याने बराच वेळ नेटमध्ये घाम गाळला. उसळणाऱ्या चेंडूचा सामना करण्यासाठी तो 'टेनिस सर्व्हिस'चा मुकाबला करीत आहे. 

जलद चेंडूंचा सामना करण्यासाठी ओल्या टेनिस चेंडूंचा सामना करणे जुनी गोष्ट आहे. पण भारतीय टीमने रैनाच्या ट्रेनिंगसाठी एक नवीन प्रकार शोधू काढला आहे. त्याने सुमारे ४५ मिनिटे टेनिस सर्व्हिसचा सामना केला. 

यापूर्वी पाकिस्तान विरूद्ध अॅडिलेड येथे झालेल्या सामन्यापूर्वी दोन स्टूलची थेअरी टीम इंडियाचा सहाय्यक स्टाफ राघवेंद्र याने अवलंबली होती.  तर हा नवीन प्रकार कोच डंकन फ्लेचर यांनी शोधून काढला आहे. ऑस्ट्रेलियाच्या मिशेल जॉन्सन आणि मिशेल स्टार्क सारख्या तेज गोलंदाजांचा सामना करण्यासाठी मानसिक रूपतेने तयार करण्यासाठी हा प्रयोग करण्यात येणार आहे. 

नेटमध्ये रैना उभा होता समोर हातात टेनिस रॅकेट घेऊन फ्लेचर उभे होते. त्यानंतर रैनाने फ्लेचर यांच्या टेनिस सर्व्हिसचा सामना करीत होता. टेनिसचा चेंडू जमिनीवर आपटल्यानंतर वेगाने उसळतो. त्यामुळे शॉर्ट पीच चेंडूंचा सामना करण्याचा सराव होतो. 

१५ मिनिटे सराव झाल्यानंतर फ्लेचर निघून गेले. त्यानंतर सर्व्हिस करण्यास धोनी आला. पण धोनीच्या तुफानी सर्व्हिस समोर रैना जरा चाचपडत होता. धोनीने या सत्रात सर्व्हिस थांबवून रैनाशी बातचित केली. रैनाने ४५ मिनिट सराव केला त्यानंतर शिखर धवनने १० मिनिटपर्यंत टेनिस सर्व्हिसचा सामना केला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.