'भारतासाठी आणखी अभिमानास्पद कामगिरी करायचीये'

नवी दिल्ली : सोमवारी बहाल करण्यात आलेल्या पद्मभूषण पुरस्कारानंतर बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने 'मला देशासाठी आणखी अभिमानास्पद कामगिरी करायची आहे' अशी प्रतिक्रिया दिली.

Updated: Mar 29, 2016, 12:22 PM IST
'भारतासाठी आणखी अभिमानास्पद कामगिरी करायचीये' title=

नवी दिल्ली : सोमवारी बहाल करण्यात आलेल्या पद्मभूषण पुरस्कारानंतर बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने 'मला देशासाठी आणखी अभिमानास्पद कामगिरी करायची आहे' अशी प्रतिक्रिया दिली.

पद्मभूषण मिळाल्याने आपल्याला खूप आनंद झाल्याची प्रतिक्रिया यावेळी सायनाने दिली. पद्मभूषण हा देशातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. सोमवारी तिला हा पुरस्कार राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

'हा खूप आनंदाचा क्षण आहे, अभिमानाचा क्षण आहे. मला खूप आनंद झालाय. माझ्या पालकांनाही याचा खूप आनंद झालाय. मला भारतासाठी आणखी जास्त अभिमानास्पद कामगिरी करायची आहे,' अशी प्रतिक्रिया तिने दिली.