जेव्हा क्रिस गेलने घेतली बिग बींची भेट

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज क्रिकेटपटू आणि टी-२० सुपरस्टार क्रिस गेलने मुंबईत दाखल झाल्यानंतर बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांची भेट घेतली.

Updated: Mar 29, 2016, 11:37 AM IST
जेव्हा क्रिस गेलने घेतली बिग बींची भेट title=

मुंबई : वेस्ट इंडिजचा धडाकेबाज क्रिकेटपटू आणि टी-२० सुपरस्टार क्रिस गेलने मुंबईत दाखल झाल्यानंतर बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांची भेट घेतली.

या भेटीचे फोटो दोघांनी इन्स्टाग्राम तसेच फेसबुकवर शेअर केलेत. अमिताभने फेसबुक पेजवर फोटो अपलोड केल्यानंतर, क्रिस गेल मला भेटण्यासाठी घरी आला होता. मला माहीत नव्हते की तो माझा चाहता आहे. अतिशय विनम्रतेने तो वागला. आशा आहे की गुरुवारी भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यातही तो संघासोबत विनम्रतेने वागेल असे म्हटलेय. 

गेलनेही या भेटीचे फोटो सोशल इन्स्टाग्रामवर अपलोड करताना अमिताभ बच्चन महान व्यक्ती आहेत. मला आमंत्रण देण्यासाठी तसेच माझा पाहुणचार करण्यासाठी खूप खूप धन्यवाद, असे पोस्ट केलेय.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या ३१ मार्चला वानखेडे स्टेडियमवर मुकाबला रंगणार आहे.