आता विराटने उघड केले पहिला सामना विजयाचे गुपीत

 भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पहिला सामना जिंकल्यानंतर इंग्लंडच्या मागील दौऱ्याबाबत नवीन खुलासे केले आहे. त्यानुसार त्याच्या फलंदाजीत बदल केले असल्याचे सांगितले. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 17, 2017, 07:05 PM IST
आता विराटने उघड केले पहिला सामना विजयाचे गुपीत  title=

पुणे :  भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पहिला सामना जिंकल्यानंतर इंग्लंडच्या मागील दौऱ्याबाबत नवीन खुलासे केले आहे. त्यानुसार त्याच्या फलंदाजीत बदल केले असल्याचे सांगितले. 

२०१४ मध्ये इंग्लंडने भारताचा दौरा केला होता. त्यावेळी विराटने पाच टेस्ट मॅच खेळल्या होत्या. त्यात धावा काढू शकला नव्हता. त्यानंतर आता यंदा इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला आहे. त्यात विराटच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. 

सुरूवातीला विराटने पाच मॅचच्या सिरीजमध्ये इंग्लंडच्या गोलंदाजीची धुलाई केली आहे. वन डे सिरीजच्या पहिल्या सामन्यातही कोहलीने १२२ धावांची शानदार खेळी केली. 

या शानदार खेळीनंतर विराट म्हटला की, इंग्लंडला गेलो तेव्हा मी स्वतःवर खूप दबाव निर्माण केला होता. त्यामुळे माझ्या फलंदाजीवर परिणाम झाला होता. पाच सामन्यात मी एकही अर्धशतक बनविले नाही. त्यामुळे मी खूप निराश होतो. मला आतापर्यंत समजल नाही की भारतीय उपमहाद्वीपात एखादा खेळाडू चांगली कामगिरी करत नाही तर तो खेळाडू चांगला नाही. असा ठप्पा का लावतात. 

कोहली म्हणाला, सुरूवातीला तुम्ही चांगली कामगिरी केली नाही तर तुमच्याबाबत सर्व चुकीचे होते. त्यामुळे मानसिक दबाव येतो. जे चुकीचे आहे. तंत्र एक चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही चांगल्या धावा काढल्या नाही तर त्या तंत्राचा काही उपयोग नाही. त्यामुळे इंग्लंड भारतात आल्यावर मी मिडल स्टंपपासून खेळण्यास सुरूवात केली. त्यामुळे माझ्या फलंदाजीवर दबाव आला आणि पण त्याचा सकारात्मक परिणाम माझ्या फलंदाजीवर झाला.