शिमला : टी-20 वर्ल्डकपची 19 मार्चला होणाऱ्या भारत-पाकिस्तान मॅचवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. आयसीसीनं जाहिर केलेल्या वेळापत्रकानुसार ही मॅच हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळा मैदानावर खेळवण्यात येणार आहे. पण पठाणकोटमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही मॅच होऊ नये, अशी मागणी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री विरभद्र सिंह यांनी दिली आहे.
मला क्रिकेटमध्ये कोणतंही राजकारण आणायचं नाही, पण पठाणकोटमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर परिस्थिती बदलली आहे. या हल्ल्यात आपले जवान शहीद झाले, त्यामुळे भारत-पाकिस्तानमध्ये मॅच व्हायला नको, असं विरभद्र सिंह म्हणालेत.