युवराज सिंग आणि केविन पीटरसनला सर्वाधिक बेस प्राईज

मुंबई : भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंग आणि इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनला यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक बेस प्राईझ ठेवण्यात आलीये. 

Updated: Jan 24, 2016, 04:04 PM IST
युवराज सिंग आणि केविन पीटरसनला सर्वाधिक बेस प्राईज title=

मुंबई : भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंग आणि इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनला यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक बेस प्राईझ ठेवण्यात आलीये. या दोघांची बेस प्राईज दोन कोटी रुपये इतकी ठेवण्यात आलीये. 

तसेच आशिष नेहरा, इशांत शर्मा, मिचेल मार्श, दिनेश कार्थिक, स्टुअर्ट बिन्नी, शेन वॉटसन, सँजू सॅमसन, धवल कुलकर्णी या क्रिकेटपटूंचीही बेस प्राईज दोन कोटी इतकी ठेवण्यात आलीये. 

ईएसपीएनक्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, बोली लावण्यात येणाऱ्या खेळाडूंची अंतिम यादी २५ जानेवारीला तयार करण्यात येणार आहे. 

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन, भारताचा मोहित शर्मा, इंग्लंडचा जोस बटलर यांची बेस प्राईज दीड कोटी ठेवण्यात आलीये. येत्या ६ फेब्रुवारीला क्रिकेटपटूंचा लिलाव होणार आहे. यंदाच्या हंगामात नव्याने समावेश करण्यात आलेले पुणे आणि राजकोट संघही बोलीत सहभागी होणार आहेत.