मुंबई : क्रिकेटच्या इतिहासात एक मोठा खुलासा झाला आहे. एका क्रिकेटरने मद्यधुंद अवस्थेत अशी खेळी केली की विरोधी टीमही संकटात आली. हर्शल गिब्सने ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात २००६ मध्ये झालेल्या सामन्यात नशेमध्ये १११ बॉलमध्ये १७५ रन्सची तुफानी खेळी केली. त्यामुळे आफ्रिकेला विजय साकारता आला.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात २००६ मध्ये हा सामना झाला होता ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने 434 रन्सचा डोंगर उभा केला होता. पण आफ्रिकेने तो डोंगर गाठला होता. गिब्सच्या मते त्याने आधल्या रात्री दारु पिला होती. दुसऱ्या दिवशीही तो मद्यधुंद अवस्थेत होता. याचा खुलासा त्याने त्याच्या ऑटोबायॉग्राफीमध्ये केला आहे.
गिब्सने याच तुफानी खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने ४३४ रन्सचं लक्ष्य गाठलं होतं. गिब्सला यासाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही मिळाला होता.