ग्लासगो : राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीत भारताला तीन गोल्ड मेडल मिळाले आहे. ऑलिम्पिक चॅम्पियन सुशीलकुमार याने पाकिस्तानी मल्लाला चितपट करून गोल्ड मेडल पटाकवले.
महिलांच्या ४८ किलो वजनी गटात भारताच्या विनेश हिने इंग्लडच्या कुस्तीपटूला नमवले तर ५७ किलो वजनी गटात भारताच्या अमित कुमार याने नायजेरियन कुस्तीपट्टूला ६-२ ने नमवून गोल्ड मेडल पटाकवले.
या मेडल्समुळे भारताच्या पदकांची संख्या ३३ वर गेली आहे. यात १० गोल्ड, १४ सिल्वर आणि ९ ब्रॉन्झ पदकांचा समावेश आहे.
सुशीलकुमार समोर पाकिस्तानचा मल्ल होता. पण पाकिस्तानचा मल्ल सुशीलकुमार समोर अगदी किरकोळ वाटत होता. सुशीलकुमारने पहिल्याच राऊंडमध्ये जबरदस्त डाव खेळत पाक मल्लाची पाठ टेकवली आणि सामना ८-२ ने चितपट करत खिशात घातला.
शुटिंगमध्ये दोन सिल्वर, दोन ब्रॉन्झ
भारतीय शूटरने आज कॉमनवेल्थ गेम्समध्ये दोन सिल्वर आणि दोन ब्रॉन्झ मेडल पटकावले.
५० मीटर थ्री पोझिशन प्रकारात भारताच्या संजय राजपूतने सिल्वर आणि गगन नारंग याने ब्रॉन्झ मेडल पटकावले. गोल्ड मेडल ब्रिटनच्या खेळाडूला गेले.
हरप्रीत सिंह याने २५ मीटर रॅपीड फायर पिस्तुल स्पर्धेत सिल्वर मेडल तर ट्रॅप शुटिंग मध्ये मानवजीत संधू याने ब्रॉन्झ पदक पटाकावून शुटिंगमध्ये भारताला आणखी दोन पदक मिळवून दिले आहे.
ऑलिम्पिक सिल्वर मेडल विजेता विजय कुमार फायनलमध्ये क्वालिफाय झाला नसल्याने निराश झालेल्या भारतीयांना पुन्हा एकदा आनंद साजरा करण्याची संधी हरप्रीत सिंह याने दिली.
यापूर्वी आज खेळण्यात आलेल्या फायनल क्वालिफिकेशन सामन्यात हरप्रीत सिंगने शानदार प्रदर्शन करत फायनलमध्ये जागा पटकावली. पण ऑलिम्पिक मेडल विजेता विजय कुमार याला फायनलमध्ये जागा मिळवता आली नाही.
यापूर्वी सोमावारी भारताने शुटिंगमध्ये तीन मेडल जिंकले. यात ५० मीटर पुरूषांच्या पिस्तुल प्रकारात जीतू राय आणि गुरपाल सिंह यांनी भारतासाठी गोल्ड मेडल पटकावले. तर ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात गगन नारंग याने सिल्वर मेडल पटकावले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.