सेहवाग-सचिन पुन्हा एकत्र खेळतांना दिसणार

वीरेंद्र सेहवागने मागील आठवड्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. मात्र अमेरिकेत होणाऱ्या एका ऑल स्टार सिरिजमध्ये वीरेंद्र सहवाग, सचिन तेंडुलकर तसेच शेन वॉर्न देखील आपल्याला मैदानात खेळतांना दिसणार आहेत.

Updated: Oct 27, 2015, 08:47 PM IST
सेहवाग-सचिन पुन्हा एकत्र खेळतांना दिसणार title=

मुंबई : वीरेंद्र सेहवागने मागील आठवड्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. मात्र अमेरिकेत होणाऱ्या एका ऑल स्टार सिरिजमध्ये वीरेंद्र सहवाग, सचिन तेंडुलकर तसेच शेन वॉर्न देखील आपल्याला मैदानात खेळतांना दिसणार आहेत.

या सर्व स्टार मॅचेस अमेरिकेत पार पडणार आहेत, न्यू यॉर्कला पहिला सामना ७ नोव्हेंबर रोजी, हडसनमध्ये दुसरा सामना ११ नोव्हेंबर आणि १४ नोव्हेंबर रोजी होणार आहे, मात्र त्याच वेळी वीरेंद्र सहवाग भारतातील काही सामन्यांना मूकणार आहे.

कारण वीरेंद्र सेहवाग आणि जो हरियाणा टीमचा सध्या कर्णधार आहे, तसेच हरियाणा टीम आसाम आणि ओरिसा विरोधात एक-एक सामना खेळणार आहे, आसामशी ७ नोव्हेंबर तर ओरिसाशी १५ नोव्हेंबरला हा सामना होणार आहे. या सामन्यांमध्ये वीरेंद्र सेहवाग खेळण्याची शक्यता कमी आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.