फ्रेंच ओपन : सेरेनाला पछाडत गॅब्रिन जेतेपदावर ताबा!

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये सेरेना विल्यम्सला नवख्या गॅब्रिन मुगुर्झाकडून पराभवाचा सामना करावा लागलाय.

Updated: Jun 4, 2016, 11:48 PM IST
फ्रेंच ओपन : सेरेनाला पछाडत गॅब्रिन जेतेपदावर ताबा! title=

नवी दिल्ली : फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये सेरेना विल्यम्सला नवख्या गॅब्रिन मुगुर्झाकडून पराभवाचा सामना करावा लागलाय.

स्पेनच्या गॅब्रिन मुगुर्झानं सेरेना विल्यम्सला ७-५, ६-४ असा सरळ सेट्समध्ये पराभवाचा धक्का दिला. 

गॅब्रिन मुगुर्झानं जागतिक टेनिस स्पर्धेमध्ये, आतापर्यंत फक्त दोनदाच विजेतेपदावर नाव कोरलंय आणि आता सेरेनाला पराभवाची चव चाखायला लावत, मुगुर्झानं फ्रेंच ओपन जेतेपदासह आपलं पहिलंवहिलं ग्रँड स्लॅम पटकावलंय.