टीममध्ये स्थान मिळालं तरी 'प्लेईंग इलेव्हन'मध्ये गंभीर दिसणार?

दिल्लीकर बॅट्समन गौतम गंभीरचं दोन वर्षांनी टीम इंडियात कमबॅक झालंय. आता गंभीरला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळते का? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Updated: Sep 28, 2016, 10:56 PM IST
टीममध्ये स्थान मिळालं तरी 'प्लेईंग इलेव्हन'मध्ये गंभीर दिसणार? title=

मुंबई : दिल्लीकर बॅट्समन गौतम गंभीरचं दोन वर्षांनी टीम इंडियात कमबॅक झालंय. आता गंभीरला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळते का? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

गौतम गंभीरची टीम इंडियाच्या टेस्ट टीममध्ये रिएंट्री झाली आहे. वास्तविक न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट टीमच्या सिलेक्शनवेळी गंभीरला सिलेक्शन कमिटीनं संधी द्यायला हवी होती. मात्र, लोकेश राहुल दुखापतग्रस्त झाल्यानं गंभीरचं टेस्ट टीममध्ये कमबॅक झालंय.

गंभीरनं पाहिली दोन वर्ष वाट...

गंभीरला टीम इंडियात स्थान न मिळण्याचं एक कारण म्हणजे विराट कोहली आणि त्याच्यातील वाद असल्याची चर्चा भारतीय क्रिकेट वर्तुळात आहे. 2013 मधील आयपीएलच्या सहाव्या सीझनमध्ये मैदानावरच विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील खडाजंगी आजही क्रिकेट चाहते विसरु शकलेले नाहीत. या घटनेनंतरच विराट आणि गंभीर यांच्यात वेळोवेळी खटके उडत गेले. महेंद्रसिंग धोनी आणि गंभीरमध्येही सारं काही आलबेलच होतं. त्यामुळेच गंभीरला टीम इंडियात संधी मिळत नव्हती अशी चर्चा आहे. मात्र, अखेर कोच अनिल कुंबळेमुळे गंभीरला टीम इंडियात स्थान मिळाल्याचं बोललं जातंय.

लोकेश राहुल दुखापतग्रस्त झाल्यानं टीम इंडियात गंभीरची एन्ट्री झालीय खरी... मात्र, कोहली आणि गंभीर यांचे संबंध फारसे चांगले नाहीत. जर प्लेईंग इलेव्हनमध्ये गंभीरला संधी मिळाली तर एकाच म्यानात या दोन तलावारी राहणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय.