नाताल (ब्राझील) : 'ग्रुप ऑफ डेथ' मध्ये आज इटली आणि उरुग्वे या माजी वर्ल्ड चॅम्पियन इटली आणि उरुग्वेमध्ये लढत रंगणार आहे. नॉक आऊटमध्ये जाण्यासाठी दोन्हीही टीम्सना विजय आवश्यक आहे. यामुळे ही लढत खऱ्या अर्थाने रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.
कोस्टा रिकाच्या सरप्राईझ पॅकेजने फुटबॉल पंडितांची सारी गणित चुकली. आधी उरुग्वे आणि नंतर इटलीला पराभूत करत कोस्टा रिकाने या दोन्हीही टीम्ससमोर एकप्रकारे 'डू ऑर डाय'ची परिस्थिती निर्माण केली आहे. दोन्हीही टीम्सला कोस्टा रिकाकडून पराभव स्वीकारावा लागल्याने दोन्हीही टीम्सकडे प्रत्येकी तीन पॉईंट्स आहेत तर सहा पॉईंट्ससह कोस्टा रिटा टॉपला आहे. यामुळे आज जी टीम पराभूत होईल त्या टीमच स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. जर मॅच ड्रॉ झाली तर गोल फरकामुळे इटलीच आव्हान जिवंत राहणार आहे. स्पेन आणि इंग्लंडनंतर अजून एका माजी वर्ल्ड चॅम्पियनला घरचा रस्ता पकडायला लागणार एवढं मात्र नक्की...
इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये शानदार कमबॅक करणाऱ्या सुवारेझवरच उरुग्वेच्या साऱ्या आशा एकवटलेल्या असतील तर एडिसन कवानीकडून पुन्हा चांगल्या खेळाची अपेक्षा उरुग्वेला असेल. आम्ही आत्तापर्य़ंत चांगल्या खेळाच दर्शन घडवल आहे इटलीविरुद्ध शक्य झालं तर अधिक चांगला खेळ आम्ही करु असा विश्वास उरुग्वेचे कोच ऑस्कर यांनी व्यक्त केलाय.
तर कोस्टा रिकाकडून पत्कराव्या लागलेल्या पराभवानंतर इटली कमबॅक करेल असा विश्वास इटलीचा कॅप्टन बफन याला वाटतोय. इतिहासावर नजर टाकल्यास वर्ल्ड कपमधील दुसरी मॅच आम्हाला वाईट ठरते. मात्र तिसऱ्या मॅचमध्ये आमची कामगिरी उंचावते, असं बफन याचं म्हणणं आहे. कॅप्टन बफनने वर्ल्ड कपमधील दुसरा पराभव टाळण्यासाठी खेळ उंचवावा, अशी टीममधील प्लेअर्सना वॉर्निंगही दिलीय. इंग्लंडविरुद्धच्या मॅचला फिटनेसमुळे मुकावं लागणारा बफन या मॅचमध्ये खेळण्याची शक्यता अधिक आहे. तर किरो ईमोबिले हादेखील मारियो बालोटेलीबरोबर इटलीची धुरा सांभाळण्याची शक्यता आहे.
उरुग्वे आपल्या जुन्याच फॉर्मेशनने ग्राऊंडवर उतरण्याची शक्यता आहे. तर इटली आपल्या फॉर्मेशनमध्ये 4-1-4-1 असा बदल करण्याची शक्यता आहे. आता कोणती माजी वर्ल्ड चॅम्पियन टीम नॉक आऊटमध्ये धडक मारते आणि कोणाला गाशा गुंडाळावा लागतो हे पाहण औत्सुक्याच ठरणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.