उरुग्वे

कोलम्बियानं उरुग्वेला 2-0नं हरवलं, क्वार्टर फायनलला धडक

 कोलम्बियानं उरुग्वेला नॉक आऊट पंच देत फुटबॉल वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली. फुटबॉल वर्ल्ड कपचा फाईंड ठरलेल्या हॅमेज रॉड्रीगेजनं दोन गोल झळकावत आपल्या टीमला पहिल्यांदा क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला. आता कोलम्बियाचा क्वार्टर फायनलचा मुकाबला असेल तो यजमान ब्राझिलियन टीमशी. 

Jun 29, 2014, 10:43 AM IST

फिफा 2014 : उरुग्वेसमोर सुआरेझविना मैदानात उतरणार कोलम्बिया

 

मुंबई : उरुग्वे आणि कोलम्बियामधील रंगतदार मुकाबल्याची ट्रीट फुटबॉल चाहत्यांना मिळणार आहे. दोन्ही टीम्स आपल्या स्टार स्ट्रायकरविना मैदानात उतरणार आहेत. लुईस सुआरेझ खेळणार नसल्यानं उरुग्वेच्या टीमला मोठा फटका बसलाय. त्यामुळे जी टीम आपल्या स्ट्रायकरविना सर्वोत्तम खेळ करेल तिच टीम क्वार्टर फायनलमध्ये धडक मारण्यात यशस्वी होईल.  

Jun 28, 2014, 08:34 AM IST

सुआरेजनं माझ्या खांद्याचा चावा घेतला - चिलिनी

इटलीचा डिफेंडर जार्जियो चिलिनीनं म्हटलं, की  उरुग्वेचा स्ट्राइकर लुई सुआरेजनं वर्ल्डकप ग्रुप डी मॅच दरम्यान त्याच्या खांद्याचा चावा घेतला होता.    

 

Jun 25, 2014, 12:57 PM IST

फिफा 2014 : इटली - उरुग्वेमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत

'ग्रुप ऑफ डेथ' मध्ये आज इटली आणि उरुग्वे या माजी वर्ल्ड चॅम्पियन इटली आणि उरुग्वेमध्ये लढत रंगणार आहे. नॉक आऊटमध्ये जाण्यासाठी दोन्हीही टीम्सना विजय आवश्यक आहे. यामुळे ही लढत खऱ्या अर्थाने रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.

Jun 24, 2014, 04:42 PM IST

फिफा फुटबॉल : इंग्लंडचं आव्हान जवळपास संपुष्टात

उरुग्वेने इंग्लंडला 2-1ने पराभूत करत इंग्लंडचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आणलय. चार आठवड्यांपूर्वी गुडघ्यावर सर्जरी झालेल्या सुआरेझने दमदार कमबॅक करत उरुग्वेच्या नावावर पहिल्या विजयाची नोंद केली. तर रुनीने पुन्हा एकदा दोन गोल्डन चान्स गमावले.

Jun 20, 2014, 07:57 AM IST

फिफा वर्ल्डकप : कोस्टा रिकाचा उरुग्वेवर 3-1 नं विजय

कोस्टा रिकानं उरुग्वेवर 3-1 अशा फरकानं विजय मिळवलाय. `ग्रुप डी`च्या सामन्यात 23 व्या मिनाटाला उरुग्वेचा एडिसन्स कवानीने पेनल्टी किकवर गोल केला.

Jun 15, 2014, 05:26 PM IST

पहिलं गे मॅरेज

उरुग्वेमध्ये पहिल्यांदाच एका गे जोडप्याने मॅरेज इक्विटी लॉ अंतर्गत स्वत:ला रजिस्टर केलय.

Aug 6, 2013, 05:50 PM IST