लंडन : क्रिकेटच्या दुनियेत नेहमी असं काहीतरी नवीन होत राहतं. जे अदभूत, अतुलनीय, अकल्पनीय असतं. लंडनमध्ये क्रिकेटच्या मैदानात असा विक्रम करण्यात आलाय, की तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा एका खेळाडूने तिहेरी शतक ठोकलंय, आणि ते देखिल फक्त १३८ चेंडूत. इंग्लंडमध्ये क्लब सामन्या दरम्यान ऑलराऊंडर लियम लिविंगस्टोनने हा वनडे क्रिकेट इतिहासात विक्रमाचा कारनामा करून दाखवलाय.
लियम लिविंगस्टोनने ३५० रन्स केले, त्यात २९८ रन्स हे फक्त चौकार आणि षटकार लावून होते. ईसीबी नॅशनल क्लब चॅम्पियनशीपमघ्ये केल्डीच्या विरोधात नॅटविंच टाऊन टीमकडून खेळतांना, लिविंगस्टोनने ३४ चौके आणि २७ षटकार लावून हा इतिहास रचला आहे.
२१ वर्षाच्या या बॅटसमनने फक्त ४७ चेंडूत १० चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने शतक पूर्ण केलं, २०० रन्सपर्यंत पोहोचण्यासाठी लियाम्सला फक्त ३७ चेंडू पुरेशे होते.
३१ चौकार आणि २२ षटकार मारत त्याने, १२३ चेंडूत ३०० रन्स पूर्ण केले. ३५० रन्स केल्यानंतर लियाम आऊट झाला आणि त्याच्या टीमने ४५ षटकांत ५७९ रन्स केल्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.