...आणि पोलार्डनं अशी व्यक्त केली आपली नाराजी!

आयपीएल- सीझन ८ मध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दरम्यान झालेल्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजच्या दोन दिग्गज खेळाडुंमध्ये चांगलाच वाद रंगला. 

Updated: Apr 20, 2015, 09:05 AM IST
...आणि पोलार्डनं अशी व्यक्त केली आपली नाराजी! title=

बंगळुरु : आयपीएल- सीझन ८ मध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दरम्यान झालेल्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजच्या दोन दिग्गज खेळाडुंमध्ये चांगलाच वाद रंगला. 

तिसऱ्या ओव्हर दरम्यान पोलार्ड आणि क्रिस गेलमध्ये हा वाद झाला. यानंतर, इंग्लंडचे अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ आणि विनीत कुलकर्णी यांनी पोलार्डला चेतावणी दिली... तेव्हा गेल चांगलाच संतापला. आपला विरोध व्यक्त करण्यासाठी तो धावत मुंबईच्या डगआऊट क्षेत्रात गेला आणि एक सेलोटेप घेऊन त्यानं तो चक्क आपल्या तोंडावर चिटकवला. 

झालं असं की, मुंबईनं उभारलेल्या २१० रन्सच्या टार्गेटला भिडताना रॉयल चॅलेंजर्सच्या क्रिस गेल आणि मनविंदर बिसला या दोन्ही ओपनर बॅटसमननं दमदार सुरुवात केली. पहिल्याच ओव्हरमध्ये क्रिस गेलनं हलकेच दिलेला कॅच सुटला आणि त्यानंतर मैदानावरचं वातावरण चांगलंच तापलं. 

चौथ्या ओव्हरपूर्वी मैदानावर पोलार्डचा बँगलोरच्या खेळाडूसोबत बाचाबाची झाली. जेव्हा हे प्रकरण जास्तच तापायला लागलं तेव्हा अंपायर्सनं पोलार्डला हटकलं.... यामुळे पोलार्ड नाराज झाला... आपली ही नाराजी उघड व्यक्त करण्यासाठी पोलार्डला युक्तीही सुचली. तो धावत डगआऊटमध्ये पोहचला... एक सेलोटेप घेतला आणि तो त्यानं आपल्या तोंडावर चिटकवला. यामुळे, ही मॅच पाहणारा प्रत्येक जण आश्चर्यचकीत झाला. 

महत्त्वाचं म्हणजे, पोलार्ड आणि गेल हे दोघेही वेस्ट इंडिजचे खेळाडू आहेत. एकाच देशाचे खेळाडू असूनही या दोघांचे संबंध मात्र तितकेसे चांगले नसल्याचं आयपीएलच्या निमित्तानं पाहायला मिळालं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.