'संघातील खेळाडू माझ्यावर जळत होते'

 इंग्लंड संघातील काही खेळाडू माझ्यावर जळत होते, असा दावा पीटरसनने केला आहे. इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार केविन पीटरसनने पुन्हा एकदा सहकारी खेळाडू हल्लाबोल केला आहे.

Updated: Jan 11, 2015, 10:29 AM IST
'संघातील खेळाडू माझ्यावर जळत होते' title=

मेलबर्न :  इंग्लंड संघातील काही खेळाडू माझ्यावर जळत होते, असा दावा पीटरसनने केला आहे. इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार केविन पीटरसनने पुन्हा एकदा सहकारी खेळाडू हल्लाबोल केला आहे.
 
वर्षभरापूर्वी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने तडकाफडकी पीटरसनला निवृत्त केलं असल्याचं सांगण्यात येतंय. मैदानाबाहेर संघ सहकारी आणि प्रशिक्षकांशी वादविवादांमुळेही पीटरसन वारंवार चर्चेत होता. 

पीटरसनला वर्षभरापूर्वीच टीममधून डच्चू देण्यात आला आहे. पीटरसनच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची नाट्यमय अखेर झाली. 
 
पीटरसनच्या निवृत्तीला वर्ष पूर्ण झालंय, त्याचं आत्मचरित्रही प्रसिद्ध झालं आहे. यात त्याने सहकाऱ्यांवर ही तोफ डागली आहे.
 
सर्वात महत्वाचं म्हणजे इंग्लंडच्या ड्रेसिंगरुममध्ये खेळाडूंना धमकी दिली जात असल्याचा आरोपही यामध्ये करण्यात आला आहे.
 
आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून यशस्वी होणारा इंग्लंडचा एकमेव खेळाडू असल्याने, माझ्यावर काही खेळाडू जळत होते, असं पीटरसनने म्हटलं आहे.

सध्या पीटरसन ऑस्ट्रेलियातील बिग बॅश आणि भारताच्या आयपीएलमध्येही खेळतोय. मात्र आयपीएलमधील यशस्वी कामगिरीमुळे अनेक जण नाराज असल्याचं पीटरसनने म्हटलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.