इंग्लंड भारताला 2-1ने हरवेल, माँटी पानेसरने व्यक्त केला विश्वास

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत सध्या इंग्लंड पिछाडीवर असला तरी पुढील तीन सामन्यांत त्यांची कामगिरी सुधारेल आणि भारताला 2-1 ने हरवेल असा विश्वास इंग्लंडचा स्पिनर माँटी पानेसरने व्यक्त केला.

Updated: Nov 25, 2016, 08:57 AM IST
इंग्लंड भारताला 2-1ने हरवेल, माँटी पानेसरने व्यक्त केला विश्वास title=

नवी दिल्ली : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत सध्या इंग्लंड पिछाडीवर असला तरी पुढील तीन सामन्यांत त्यांची कामगिरी सुधारेल आणि भारताला 2-1 ने हरवेल असा विश्वास इंग्लंडचा स्पिनर माँटी पानेसरने व्यक्त केला.

एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत त्याने हा विश्वास व्यक्त केला.  मालिकेत निर्णायक सामन्यांमध्ये विजय मिळवण्याची इंग्लंडची खासियत आहे आणि भारताविरुद्ध नेहमीच इंग्लंड निर्णायक सामन्यांत जिकलाय.

त्यामुळे या मालिकेतही असेच होईल. मला वाटते इंग्लंड भारताला 2-1 ने हरवेल. राजकोट आणि विशाखापट्टणम येथील चुका टाळल्यास ते पुढील सामन्यात विजय मिळवू शकतील. मात्र भारताला भारतात हरवणे तितकेसे  सोपेही असणार नाहीये. मात्र पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळ करायला हवा, असे पानेसर म्हणाला,