सायना, सिंधू हाँगकाँग ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत

चायना ओपन विजेती पी.व्ही.सिंधू आणि फुलराणी सायना नेहवालने हाँगकाँग ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारलीये.

Updated: Nov 25, 2016, 07:57 AM IST
सायना, सिंधू हाँगकाँग ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत title=

कोवलून : चायना ओपन विजेती पी.व्ही.सिंधू आणि फुलराणी सायना नेहवालने हाँगकाँग ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारलीये.

गेल्या आठवड्यात आपले पहिले वहिले सुपर सीरिजचे जेतेपद जिंकणाऱ्या रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती सिंधूने चीन तैपेईच्या सु या चिंगला 21-10, 21-14 असे सहज हरवले. 

तर गुडघ्याच्या दुखापतीतून सावरलेली सायनाने जपानच्या सयाका सातोला संघर्षपूर्ण सामन्यात 21-18, 9-21, 21-16 असे पराभूत केले. 

सिंधूचा पुढील सामना सिंगापूरच्या झियाओ लियांग हिच्याशी असणार आहे. तर सायनाची लढत हाँगकाँगच्या चियांग नगान यी हिच्याशी होईल. 

पुरुष एकेरीत अजय जयरामने चीनच्या हुआंग युक्सियांगला 21-18, 21-19 असे नमवले. तर समीर वर्माने जपानच्या काजुमासा सकाईला 19-21, 21-15, 21-11 अशी धूळ चारली.