'सचिन-सचिन आहे, विराट नाही'

पाकिस्तानच्या ट्वेंटी-20 संघाचा कर्णधार शाहिद आफ्रिदीने म्हटले आहे, "मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची जागा सध्या कोणताच क्रिकेटपटू घेवू शकत नाही. म्हणून विराट कोहलीची मास्टर ब्लास्टरबरोबर तुलना करणे चुकीचे आहे", असे देखील आफ्रिदीने म्हटलंय.

Updated: Mar 7, 2016, 10:09 AM IST
'सचिन-सचिन आहे, विराट नाही' title=

कराची : पाकिस्तानच्या ट्वेंटी-20 संघाचा कर्णधार शाहिद आफ्रिदीने म्हटले आहे, "मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची जागा सध्या कोणताच क्रिकेटपटू घेवू शकत नाही. म्हणून विराट कोहलीची मास्टर ब्लास्टरबरोबर तुलना करणे चुकीचे आहे", असे देखील आफ्रिदीने म्हटलंय.

"सचिन तेंडुलकरशी तुलना करणे अयोग्य असल्याचे मी यापूर्वीही म्हटले आहे. सचिन हा कोट्यवधी भारतीयांचा आदर्श असून, त्याचे जगभरात चाहते आहेत. विराट हा चॅम्पियन खेळाडू आहे, यात शंकाच नाही. तो सातत्यपूर्ण कामगिरी करतोय, त्याची आक्रमकवृत्ती खेळासाठी चांगली आहे. सचिन आणि विराट हे दोघेही सर्वोत्तम क्रिकेटपटू असल्याने यापैकी एकाची सर्वोत्तम म्हणून मी निवड करु शकत नाही."

विराटकडून सध्या शतकांचा धडाकाच सुरु असल्याने शतकांच्याबाबत तो सचिनलाही मागे टाकल्याचे बोलले जात आहे. कोहलीने आशिया करंडक स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्याने पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. विराट कोहली हा सध्या जबरदस्त फॉर्मात आहे, त्याची तुलना सचिन तेंडुलकरसोबत करण्यात येत आहे. 

सचिनने आपल्या कारकिर्दीत फक्त एक ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. सचिनने 2012 मध्ये निवृत्ती घेतल्यानंतर कोहलीलाच पुढचा सचिन असल्याची पावती क्रिकेटप्रेमींनी दिली आहे.