बोल्टन: आज विम्बल्डनमध्ये सुपरसंडेचा सुपर मुकाबला रंगला आणि नोवाक जोकोविच दुसऱ्यांदा ‘विम्बल्डन’चा चॅम्पियन ठरलाय. जोकोविचनं फेडरलला 6-7,6-4,7-6,5-7,6-4मध्ये पराभूत केलं.
सातवेळेचा विम्बल्डन विजेता आणि माजी वर्ल्ड नंबर वन रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविचमध्ये आज विम्बल्डनची फायनल रंगली. विक्रमी आठवं विजेतेपद पटकावण्याच्या इराद्यानंच फेडरर आज कोर्टवर उतरला होता. मात्र सुरुवातीपासूनच जोकोविचनं आपल्या गेमवर पकड ठेवली होती. सलग दोन सेट जिंकल्यानंतर जोकोविचनं तिसरा आणि चौथा सेट गमावला आणि फेडरलनं पुन्हा आपली जादू दाखवली.
पण पाचव्या सेटमध्ये फेडरलला हरवून जोकोविचनं विम्बल्डन ग्रँडस्लॅम जिंकलं.
दरम्यान, 17 ग्रँड स्लॅमला गवसणी घालणाऱ्या फेडररनं 2003मध्ये सर्वात प्रथम विम्बल्डनचं विजेतेपद पटकावलं होतं. 2012मध्ये विम्बल्डनचं विजेतेपद पटकावल्यानंतर फेडररला अद्यापपर्यंत एकही ग्रँड स्लॅम पटकावता आलेलं नाही. तर जोकोविचनं 2011मध्ये विम्बल्डनचं विजेतेपद पटकावलं होतं.
विशेष म्हणजे फेडररला माजी विजेते स्टीफन एडबर्ग आणि जोकोविचला माजी विजेते बोरिस बेकर यांच मार्गदर्शन लाभलं होतं. म्हणजे एक प्रकारे ही लढत एडबर्ग आणि बोरिस बेकर यांच्या दरम्यानही रंगली. बेकर आणि एडबर्ग 11वेळा ग्रँड स्लॅम स्पर्धेत आमने-सामने आले होते. आता हे दोन दिग्गज तब्बल 24 वर्षांनी फेडरर आणि जोकोविचच्या माध्यमातून एकमेकांसमोर उभे ठाकले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.