धोनी, कोहलीने उडवली अश्विनची खिल्ली

इंडियन प्रीमियर लीगमधील रायजिंग पुणे सुपरजायंटचा कर्णधार धोनी एका जाहिरातीत क्रिकेटपटू अश्विनची फिरकी घेताना दिसतोय. या जाहिरातील रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार विराट कोहलीही आहे. 

Updated: Apr 22, 2016, 02:12 PM IST
धोनी, कोहलीने उडवली अश्विनची खिल्ली title=

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगमधील रायजिंग पुणे सुपरजायंटचा कर्णधार धोनी एका जाहिरातीत क्रिकेटपटू अश्विनची फिरकी घेताना दिसतोय. या जाहिरातील रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार विराट कोहलीही आहे. 

सोशल मीडियावर या तिघांचा व्हिडीओ व्हायरल होतोय. अश्विन फोनवर कंगनाचा चित्रपट पाहत असतो. त्यावेळी तिथे धोनी आणि विराट येतात आणि त्याला कंगनावरुन चिडवू लागतात. तेव्हा अश्विन म्हणतो पिक्चर क्वालिटी बकवास आहे. या वाक्यावर धोनी आणि विराट हसू लागतो.

याव्हिडीओत विराट, धोनी, अश्विनसह कंगना राणावत अजिंक्य रहाणेही दिसत आहे. 

पाहा हा व्हिडीओ