रिओ : ऑलिम्पिकमध्ये भारतीय तिरंदाज अचूक वेधन साधण्यात यशस्वी होतायत. दीपिका कुमारीनंही टॉप 16 मध्ये आपलं स्थान निश्चित केलंय. तर दुसरीकडेही भारतीय बॉक्सर मनोज कुमारने विजयी सुरुवात केलीये.
दीपिकानं आपल्या दोन्ही मुकाबल्यांमध्ये पिछाडी भरुन काढत विजयावर शिक्कामोर्तब केलं. पाऊस आणि वा-याच्या वेगाश़ी सामना करत तिनं हा विजय साकारला त्यामुळे दिपीकाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आता प्री-क्वार्टर फायनलमध्ये दीपिकाचा मुकाबला चीन तैपईच्या तांन या तिंगशी मुकाबला करावा लागणार आहे. अततून दासनंतर आता दिपिकानंही ऑलिम्पिक पदकाच्या आशा पल्लवित केल्यात.
तर बॉक्सर मनोज कुमारनंही 2012 लंडन ऑलिम्पिकचा ब्राँझ मेडलिस्ट इव्हाल्डस पेट्राऊसकासवर मात करत त्यानं पुढच्या फेरीचा आपला प्रवेश निश्चित केलाय.
मनोजनं आपली बाऊट 2-1नं जिंतली. इव्हाल्डसनं आक्रमक खेळ केला मात्र मनोज कुमारनं त्याचं आव्हान परतवून लावत प्री-क्वार्टर गाठली. आता प्री-क्वार्टरमध्ये त्याला उझबेकिस्तानच्या पाचव्या मानांकित फाझिलिड्डीन गैबनझारोव्हशी होणार आहे.
गौबनझारोव्हा हा 2015 वर्ल्ड चॅम्पियनशिपचा सिल्व्हर मेडलिस्ट तर आहेच शिवाय एशियन चॅम्पियनशिपचाही तो सिल्व्हर मेडलिस्ट आहे. त्यामुळे प्री-क्वार्रटमध्ये मनोज कुमारची चांगलीच कसोटी लागणार आहे.