आमिरने शाहरूखला फोन केला आणि ते बोलले सलमानबद्दल

 आमिर खान, सलमान खान आणि शाहरूख खान या तिघांनी १९९० पासून बॉलिवूडवर अधिराज्य केले आहे. तिघांनी एकाच कालावधीत आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात केली. विशेष म्हणजे सारख्याच वयात असताना ही सुरूवात झाली. 

Updated: Dec 3, 2015, 10:18 AM IST
आमिरने शाहरूखला फोन केला आणि ते बोलले सलमानबद्दल  title=

मुंबई :  आमिर खान, सलमान खान आणि शाहरूख खान या तिघांनी १९९० पासून बॉलिवूडवर अधिराज्य केले आहे. तिघांनी एकाच कालावधीत आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात केली. विशेष म्हणजे सारख्याच वयात असताना ही सुरूवात झाली. 

यात तिन्ही खानांमधील एकोपा गेल्या काही दिवसांपासून खूपच वाढत आहे. काही दिवसांपूर्वी ते एका कार्यक्रमात एकत्र दिसले होते. फोटोग्राफरला त्यांना एकत्र टीपण्याची संधी मिळाली होती. 

बॉलीवूडलाइफ डॉट कॉम यांनी दिलेल्या एका बातमीनुसार आमीर खान याने शाहरूख खान याला त्याच्या वाढदिवसानिमित्त फोन केला होता. त्याने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. पण बोलता बोलता त्यांचा विषय सलमान खानवर आला होता. 

या दोघांनी सलमान खानच्या या वर्षातील यशाबद्दल चर्चा केली. सलमानने बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी केली. सुरूवातीला त्याने बजरंगी भाईजान आणि आता प्रेम रतन धन पायो याने जे यश मिळाले त्याबद्दल दोघांनी चर्चा केली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.