भारताचा सलग चौथा विजय, वेस्ट इंडिजवर ४ विकेटने मात

भारताने सलग चार विजय संपादन केल्याने क्वार्टर फाइनलमध्ये धडक मारली आहे. टीम इंडियाच्या बॉलरने भेदक मारा केल्याने वेस्ट इंडिज टीकाव लागू शकला नाही. वेस्ट इंडिजचा डाव १८२ रन्सवर आटोपला. 

Updated: Mar 6, 2015, 09:13 PM IST
भारताचा सलग चौथा विजय, वेस्ट इंडिजवर ४ विकेटने मात title=

पर्थ : भारताने सलग चार विजय संपादन केल्याने क्वार्टर फाइनलमध्ये धडक मारली आहे. टीम इंडियाच्या बॉलरने भेदक मारा केल्याने वेस्ट इंडिज टीकाव लागू शकला नाही. वेस्ट इंडिजचा डाव १८२ रन्सवर आटोपला. 

भारतातर्फे मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या आहेत. वर्ल्डकपमध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षणासाठी भारतीय संघाचे कौतुक केले असले तरी या सामन्यात भारतीय क्षेत्ररक्षकांनी तब्बल ४ झेल सोडले. या ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे विंडीजला १८१ रन्सचा आकडा गाठता आला. भारतातर्फे उमेश यादव व रवींद्र जडेजाने प्रत्येकी दोन तर आर. अश्विन व मोहित शर्माने प्रत्येकी एक विकेट घेतली. 

भारताची सुरुवात निराशाजनक झाली. २० रन्सवर २ विकेट गेल्या. त्यानंतर पडझड सुरुच होती. महेंद्रसिंग धोनी मैदानात आल्यानंतर विकेट जातच होत्या. सुरेश रैना, विराट कोहली, रवींद्र जडेजा यांनी आपला प्रभाव पाडू शकले नाहीत. धोनीने किल्ला लढवत डाव सावत विजय साकार केला. ४ विकेटने टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर मात केली आणि सलग चौथा विजय साजरा केला.

विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांच्या भेदक मा-याने विंडीजची अक्षरशः वाताहत झाली. यंदाच्या विश्वचषकात द्विशतक ठोकणारा ख्रिस गेल (२१ रन्स) याच्यासह विंडीजचे आघाडीचे सर्व फलंदाज स्वस्तात तंबूत परतले. वेस्ट इंडिजची अवस्था ७ विकेट ८५ रन्स अशी होती. यानंतर डॅरेन सॅमी (२६ रन्स) आणि कर्णधार जेसन होल्डरने विंडीजला १२५ चा पल्ला गाठून दिला. सॅमी बाद झाल्यावर  होल्डरने जेरोम टेलरच्या (११ रन्स) साथीने विंडीजला १५० टप्पा गाठून दिला. होल्डरने ५७ रन्स करत संघाला १८२ रन्सवर नेले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.