भारत जिंकला तर क्वार्टर फायनलचा 'मौका' पाकिस्तानला

भारताने सलग चार विजय संपादन केल्याने क्वार्टर फाइनलमध्ये धडक मारली आहे. मात्र, पाचवा सामना  भारताने जिंकला तर पाकिस्तान थेट क्वार्टर फायनलमध्ये पोहोचणार आहे. त्यामुळे आयर्लंडबरोबर भारत हरणे तसे शक्य नाही. याचा लाभ पाकला मिळण्याची शक्यता अधिक आहे.

Updated: Mar 6, 2015, 09:41 PM IST
भारत जिंकला तर क्वार्टर फायनलचा 'मौका' पाकिस्तानला title=

पर्थ : भारताने सलग चार विजय संपादन केल्याने क्वार्टर फाइनलमध्ये धडक मारली आहे. मात्र, पाचवा सामना  भारताने जिंकला तर पाकिस्तान थेट क्वार्टर फायनलमध्ये पोहोचणार आहे. त्यामुळे आयर्लंडबरोबर भारत हरणे तसे शक्य नाही. याचा लाभ पाकला मिळण्याची शक्यता अधिक आहे.

टीम इंडियाच्या बॉलरने भेदक मारा केल्याने वेस्ट इंडिज टीकाव लागू शकला नाही. वेस्ट इंडिजचा डाव १८२ रन्सवर आटोपला. भारतातर्फे मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या आहेत. वर्ल्डकपमध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षणासाठी भारतीय संघाचे कौतुक केले असले तरी या सामन्यात भारतीय क्षेत्ररक्षकांनी तब्बल ४ झेल सोडले. या ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे विंडीजला १८१ रन्सचा आकडा गाठता आला.

भारताची सुरुवात निराशाजनक झाली. २० रन्सवर २ विकेट गेल्या. त्यानंतर पडझड सुरुच होती. महेंद्रसिंग धोनी मैदानात आल्यानंतर विकेट जातच होत्या. सुरेश रैना, विराट कोहली, रवींद्र जडेजा यांनी आपला प्रभाव पाडू शकले नाहीत. धोनीने किल्ला लढवत डाव सावत विजय साकार केला. ४ विकेटने टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर मात केली आणि सलग चौथा विजय साजरा केला.

India vs Ireland Mauka Mauka

मंगळवारी भारत आणि आयर्लंड यांच्यात सामना होणार आहे. हा सामना भारत सहज जिंकेल, असेच दिसत आहे. त्यामुळे याचा लाभ पाकिस्तानला होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे हा सामना भारताने गमावणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

India vs Ireland New(Mauka Mauka)

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.