'GOOD BYE फिल'... ह्युजला अंतिम निरोप!

फिलीप ह्युजेस यांच्यावर आज त्याच्या गावी मॅक्सव्हिल येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Updated: Dec 3, 2014, 07:53 PM IST
'GOOD BYE फिल'... ह्युजला अंतिम निरोप! title=

मॅक्सविले (ऑस्ट्रेलिया) : फिलीप ह्युजेस यांच्यावर आज त्याच्या गावी मॅक्सव्हिल येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

अंत्यसंस्कार कार्यक्रमाला यावेळी कॅप्टन मायकल क्लार्कसह संपूर्ण टेस्ट टीम स्क्वॉड हजर होती. केवळ एवढेच नव्हे तर अनेक आजी माजी ऑसी क्रिकेटर्सनेही हजेरी लावली होती. फिलच्या अंत्यसंस्काराला त्याचे नातेवाईक आणि जवळचे मित्र असे जवळपास अडीच हजार लोकं उपस्थित होते. फिलच्या अंत्यसंस्कारावेळी पॉलबेअरर असलेल्या मायकल क्लार्कने फिलच्या आठवणींना उजाळा दिला तेव्हा तर हॉलमधील उपस्थितांना अश्रू आवरणेही कठीण झालं होतं. 

ह्यूजला श्रद्धांजली देताना जेव्हा अखेरचे शब्द बोलले गेले तेव्हा तर भर सभागृहात हुंदक्यांचा आवाज फिरत होता. ऑसी कॅप्टन मायकल क्लार्कलाही स्वत;वर ताबा ठेवण्याकरता बरीच मेहनत करावी लागत होती. मायकल क्लार्कने ह्युजचा भाऊ आणि वडिलांसह त्याच्या कॉफिनला खांदा दिला. ह्यूजच्या शोकसभेला ऑस्ट्रेलियन पंतप्रधान टोनी अबॉटही उपस्थित होते. त्याला श्रद्धांजली देण्यात आल्यानंतर जेव्हा त्याचं कॉफिन सभागृहाबाहेर नेण्यात आलं तेव्हा एल्टन जॉनचं 'डोंट लेट द सन गो डाऊन ऑन मी' हे गाणं वाजवण्यात आलं. 

आकर्षक पांढऱ्या फुलांनी सजवलेल्या चॉकलेटी रंगाच्या कॉफिनमध्ये चिरनिद्रा घेणाऱ्या फिल ह्युजेसच्या शेजारी त्याची आवडती बॅट, तसंच बॅगी ग्रीन कॅप, त्याच्या डोमेस्टीक टीमची कॅप आणि त्याचा ऑस्ट्रेलिय न क्रिकेटचा गणवेषही ठेवण्यात आला होता. या अंत्यसंस्काराला ऑस्ट्रेलियन पंतप्रधान टोनी अबॉटही हजर होते. ऑस्ट्रेलियन टीम प्लेअर्सने ह्युजच्या कॉफिनच्या दोन्ही बाजुला उभं राहत त्याला अखेरची मानवंदना दिली. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली, रोहित शर्मा, आणि रवी शास्त्री यांनीही फिलला आदरांजली वाहिली.
 
पंतप्रधान मोदींची ह्युजला श्रद्धांजली...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीटरवर ह्युजेसला श्रद्धांजली वाहिलीय. ऑस्ट्रेलियात झालेले अंत्यसंस्कार हृदय हेलावणारे आहेत. 'फिल ह्युजेस... आम्हाला तुझी कमतरता जाणवेल! तुझा खेळ आणि सळसळता उत्साह यामुळे तू सर्वत्र चाहते निर्माण केलेस... रेस्ट इन पिस!' असं पंतप्रधानांनी म्हटलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.