नवी दिल्ली : सिडनीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अखेरचा टी-२० सामना अटीतटीचा झाला. अंतिम क्षणी युवराज आणि रैनाने संयमतेने खेळ करताना भारताला विजय मिळवून दिला. रैनाने अंतिम चेंडूत मारलेला चौकार कोणताही क्रिकेटप्रेमी विसरु शकणार नाही. या चौकारामुळे १४० वर्षांचा इतिहास भारताने बदलला होता.
या मोक्याच्या क्षणी युवी आणि रैना यांच्यात जी बातचीत झाली त्याचा खुलासा रैनाने केलाय. मॅचच्या अंतिम ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर युवराजने आपल्याला काहीही करुन एक रन घ्यायचाय असे सांगितले. यापूर्वी त्याने एक चौकार आणि षटकार ठोकून दबाव काही प्रमाणात कमी केला होता. या चेंडूत आम्ही दोन धावा घेतल्या. तेव्हा युवराजने मला आता तु मॅच संपवू शकतो असे सांगितल्याचे रैना म्हणाला.
अखेरच्या चेंडूत जिंकण्यासाठी २ धावा हव्या होत्या. यावेळी स्ट्राईकवर होता रैना. रैनाने जोरदार चौकार लगावून भारताच्या पारड्यात आणखी एक विजय टाकला.