बंगळुरू : आयपीएलच्या दहाव्या मोसमासाठीचा लिलाव बंगळुरूमध्ये पार पडला. या लिलावामध्ये इंग्लंडचा बेन स्टोक्स हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. पुण्याच्या टीमनं स्टोक्सला तब्बल 14.50 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. इंग्लंडचाच टायमल मिल्स हा दुसरा महागडा खेळाडू आहे. मिल्सला कोहलीच्या आरसीबीनं 12 कोटी रुपयांना विकत घेतलं.
यंदाच्या लिलावामध्ये काही अनपेक्षित घटनाही घडल्या. इशांत शर्मा आणि इरफान पठाण यांच्यावर कोणत्याच फ्रँचायजीनं बोली लावली नाही तर अफगाणिस्तानच्या मोहम्मद नाबीला हैदराबादनं विकत घेतलं. नाबी हा आयपीएलमध्ये दिसणारा पहिला अफगाणी खेळाडू असेल.
मुंबई इंडियन्स
मिचेल जॉन्सन, के. गौतम, कर्ण शर्मा, सौरभ तिवारी, ए. गुनरत्ना, निकोलस पूरन, के. खेजरोलिया
रायझिंग पुणे सुपरजायंट्स
बेन स्टोक्स, डॅनियल ख्रिश्चन, लॉकी फर्ग्युसन, लॉकी फर्ग्युसन, मनोज तिवारी, जयदेव उनाडकाट, राहुल चहार, सौरभ कुमार, मिलिंद टंडन, आर. त्रिपाठी
कोलकाता नाईट रायडर्स
ट्रेंट बोल्ट, क्रिस वोक्स, रोमॅन पॉवेल, नॅथन कूल्टर नाईल, डॅरेन ब्राव्हो, ऋषी धवन, आर. संजय यादव, इशांक जग्गी, सयान घोष
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
टायमल मिल्स, बिली स्टॅनलेक, पवन नेगी, अंकित चौधरी, प्रविण दुबे
सनरायझर्स हैदराबाद
मोहम्मद नाबी, रशिद खान, क्रिस जॉर्डन, बेन लॉफलीन, मोहम्मद सिराज, प्रविण तांबे, तन्मय अग्रवाल, एकलव्य द्विवेदी
गुजरात लायन्स
जेसन रॉय, मुनाफ पटेल, मनप्रीत गोनी, अक्षदीप नाथ, नथ्थू सिंग, चिराग सुरी, तेजस सिंह बरोका, बसिल थंपी, शेली शौर्य, शुभम अग्रवाल
दिल्ली डेअरडेव्हिल्स
पॅट कमिन्स, कॅगिसो रबाडा, कोरी अँडरसन, अँजेलो मॅथ्यूज, आदित्य तरे, एम. अश्विन, अंकित बावने, शशांक सिंग, नवदीप सायनी
किंग्ज इलेव्हन पंजाब
इयॉन मॉर्गन, मॅट हेनरी, वरुण अरॉन, मार्टिन गप्टील, डॅरेन सॅमी, राहुल तेवाटिया, टी. नटराजन, रिंकू सिंग