षटकांराचा बादशाह क्रिस गेल

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या क्रिस गेलने झंझावाती खेळ करताना ४८ चेंडूत नाबाद १०० धावांची झुंजार खेळी केली. या खेळीसोबतच गेलने टी-२० मध्ये अनेक रेकॉर्डही आपल्या नावे केले. 

Updated: Mar 17, 2016, 08:20 AM IST
षटकांराचा बादशाह क्रिस गेल title=

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या क्रिस गेलने झंझावाती खेळ करताना ४८ चेंडूत नाबाद १०० धावांची झुंजार खेळी केली. या खेळीसोबतच गेलने टी-२० मध्ये अनेक रेकॉर्डही आपल्या नावे केले. 

गेलने या सामन्यात केवळ धुवांधार खेळीच केली नाही तर टी-२० वर्ल्डकपमध्ये दोन शतके ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरलाय. यापूर्वी २००७च्या वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गेलने ११७ धावा तडकावल्या होत्या. 

 

इंग्लडविरुद्ध गेलने ११ षटकार ठोकले. यासोबतच टी-२०मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा तो अव्वल फलंदाज ठरलाय. त्याच्यामागे न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅकक्युलमचा नंबर लागतो. 

आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये गेलने एकूण १४ अर्धशतके झळकावलीत. त्याच्यानंतर विराट कोहलीने १३ अर्धशतके झळकावलीत. 

एका सामन्यात १० आणि १०हून अधिक षटकार ठोकण्याचा विक्रमही गेलच्या नावावर आहे. याआधी २००७मध्ये जोहान्सबर्गमध्ये त्याने द. आफ्रिकेविरुद्ध १० षटकार ठोकले होते. 

तसेच टी-२०मध्ये वैयक्तिक सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही गेल नंबर वन आहे.