चेन्नई सुपरकिंग्स टीमची किंमत केवळ 5 लाख रूपये

आयसीसीचे चेअरमन एन श्रीनिवासन आणि चेन्नई सुपर किंग टीम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. इंडिया सिमेंटने केवळ ५ लाखात चेन्नई टीम आपल्या सहयोगी टीमला विकून टाकण्याचा निर्णय घेतला. 

Updated: Apr 24, 2015, 05:20 PM IST
चेन्नई सुपरकिंग्स टीमची किंमत केवळ 5 लाख रूपये title=

नवी दिल्ली : आयसीसीचे चेअरमन एन श्रीनिवासन आणि चेन्नई सुपर किंग टीम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. इंडिया सिमेंटने केवळ ५ लाखात चेन्नई टीम आपल्या सहयोगी टीमला विकून टाकण्याचा निर्णय घेतला. 

ही बाब त्यावेळी उघ़ड झाली जेव्हा आयपीएल गव्हर्निंग काउंसिलने या व्हॅल्यूऐशनला मानण्यास नकार दिला आणि टीमच्या विक्रीलाही नकार दिला. 

बीसीसीआयच्या नियमांनुसार आयपीएलच्या कोणत्याही टीमच्या विक्रीवेळी टीमच्या किंमतीच्या पाच टक्के किंमत बीसीसीआयला मिळते. जर काउंसिलने ५ लाख किंमतीला सहमती दर्शवली असती तर या व्यवहारात बीसीसीआयला केवळ 25000 रूपये मिळाले असते. 

जुन्या काउंसिलने टीमच्या या किंमतीवर कोणताही आक्षेप घेतला नव्हता. मात्र सुप्रीम कोर्टच्या आदेशानंतर स्थापन करण्यात आलेल्या काउंसिलने सोमवारी झालेल्या बैठकीत या विक्रीला मंजूरी देण्यास नकार दिला. मागील वर्षी अमेरिकेत एका कंन्सलटन्सीने या टीमची किंमत 450 कोटी लावली होती. 

या वर्षाच्या जानेवारी महिन्यात सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला होता की, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना अधिकारीक पद आणि आयपीएल टीमची मालकी यांपैकी एका पदावर राहता येईल. या निर्णयामुळे एन श्रीनिवासन यांनी चेन्नई सुपरकिंग्सला इंडिया सिमेंटला विकण्याचा निर्णय घेतला होता. 
 
या टीमचं आयपीएलमधील प्रदर्शन उत्कृष्ट आहे. महेंद्र सिंग धोनी, सुरेश रैना, रविंद्र जडेजा, ब्रॅंडन मॅक्क्युलम यांसारखे स्टार खेळाडू या टीममधून खेळतात. दोनवेळा टीमने आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.