जॉन्टी रोडस् बाबा झाला, मुलीचा मुंबईत जन्म...नाव ठेवले भारतीय

दक्षिण आफ्रिकेचा महान फिल्डर जॉन्टी रोडस् च्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. वॉटर डिलिव्हरी (नैसर्गिक पाण्यात जन्म) करण्यात आली.

Updated: Apr 24, 2015, 09:50 AM IST
जॉन्टी रोडस् बाबा झाला, मुलीचा मुंबईत जन्म...नाव ठेवले भारतीय title=

मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा महान फिल्डर जॉन्टी रोडस् च्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. वॉटर डिलिव्हरी (नैसर्गिक पाण्यात जन्म) करण्यात आली.

मुंबईतील सांताक्रूझ येथील एका रुग्णालयात आज दुपारी ३.२९ वाजता जॉन्टीच्या पत्नीने मुलीला जन्म दिला. बाळाचे वजन ३.७१० किलो असून दोघांची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याने आपल्या मुलीचे नाव India Jeanne Jonty Rhodes असे ठेवले.

नैसर्गिक पाण्यात जन्म होणे सर्वात सुरक्षित आणि बाळाच्या आईसाठी कमी वेदनादायक असते. असे बाळंतपण अमेरीका, इंग्लंड येथे करण्यास प्राधान्य देण्यात येते. जॉन्टीने मुंबईत आपल्या मुलीचा जन्म नैसर्गिक पाण्यात करण्याचा निर्णय घेतला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.