डेथ ओव्हरमध्ये बुमराहची कामगिरी चांगली होतेय - धोनी

डेथ ओव्हरमध्ये सक्षम गोलंदाजी करणाऱ्या जसप्रीत बुमराहच्या कामगिरीवर कर्णधार महेंद्रसिंग धोनी चांगलाच खुश आहे. गुजरातचा हा गोलंदाज नव्या चेंडूनेही तितक्याच प्रभावीपणे गोलंदाजी करतो. 

Updated: Mar 2, 2016, 04:28 PM IST
डेथ ओव्हरमध्ये बुमराहची कामगिरी चांगली होतेय - धोनी title=

मिरपूर : डेथ ओव्हरमध्ये सक्षम गोलंदाजी करणाऱ्या जसप्रीत बुमराहच्या कामगिरीवर कर्णधार महेंद्रसिंग धोनी चांगलाच खुश आहे. गुजरातचा हा गोलंदाज नव्या चेंडूनेही तितक्याच प्रभावीपणे गोलंदाजी करतो. 

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही बुमराहने दोन विकेट घेत चांगला खेळ केला होता. मात्र डेथ ओव्हरमध्ये झालेल्या त्याच्या गोलंदाजीवर धोनी खुश आहे. डेथ ओव्हरमध्ये त्याने चांगला खेळ केला. लोकांनी हे समजून घ्यायल्या हवे की तो रनही देईल. आतापर्यंत त्याने नवा चेंडू हाताळताना तसेच डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केलीये, असे धोनी म्हणाला. 

यावेळी धोनीने इतर क्रिकेटपटूंचेही कौतुक केले. विराट आणि युवराजच्या चांगल्या खेळीमुळे तिसऱ्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर मात करत फायनल फेरी गाठली.