चंडीगड : टीम इंडियाचा स्पिनर हरभजन सिंग याच्या लग्नात तैनात करण्यात आलेले बाऊन्सर घातलेल्या गोंधळाने 'रंग मेँ भंग' निर्माण झाला होता.
भज्जीच्या विवाह सोहळ्याचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांशी त्याच्या बाऊन्सरनी शुल्लक कारणांवरून मारहाण करून त्यांच्या कॅमेऱ्यांची तोडफोड केलीची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी चार बाउन्सरना अटक केली आहे.
अभिनेत्री गीता बसरा हिच्यासोबत काल हरभजनसिंगनं लग्नगाठ बांधली. विवाहाच्या पारंपरिक विधीनंतर गृहप्रवेशाचा सोहळा होता. हा सोहळा कव्हर करण्यासाठी पत्रकारांनीही गर्दी केली होती. मात्र, सुरक्षेसाठी असलेल्या बाउन्सरनी या पत्रकारांना फोटो टिपण्यास विरोध करत त्यांचे कॅमेरे तोडून टाकले. तर, काही पत्रकारांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
बाउन्सरच्या या दादागिरीमुळं संतापलेल्या पत्रकारांनी भज्जीच्या घरासमोर धरणं आंदोलन सुरू केलं. या मंगलसमयी आणखी वाईट घटना होऊ नये म्हणून हरभजननं हुशारीनं पत्रकारांची माफी मागितली. पोलिसांनीही लगेचच बब्बल, गुरप्रीत, नवज्योत, कुलदीप या बाउन्सरना अटक करून कारवाईचं आश्वासन दिलं. त्यानंतर पत्रकारांनी आंदोलन मागं घेतलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.