यंदाच्या सिझनमध्ये अशी असेल टीम इंडियाची जर्सी

यंदाच्या सिझनसाठी टीम इंडियच्या जर्सीचं लॉन्चिंग बीसीसीआयनं केलं आहे.

Updated: Jan 12, 2017, 05:38 PM IST
यंदाच्या सिझनमध्ये अशी असेल टीम इंडियाची जर्सी  title=
सौजन्य- बीसीसीआय

मुंबई : यंदाच्या सिझनसाठी टीम इंडियच्या जर्सीचं लॉन्चिंग बीसीसीआयनं केलं आहे. यंदा होणाऱ्या वनडे सिझनसाठी ही जर्सी वापरण्यात येणार आहे. महिला आणि पुरुषांच्या टीमसाठी सारखीच जर्सी यंदाही असणार आहे. विराट कोहली, एम.एस.धोनी, अजिंक्य रहाणे, आर.अश्विन आणि महिला टीमची कॅप्टन हरमनप्रीत कौर यांच्या उपस्थितीमध्ये जर्सीच्या लॉन्चिंगचा कार्यक्रम पार पडला.

इंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे सीरिजला रविवार 15 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली वनडेमध्ये पहिल्यांदाच टीम इंडिया मैदानात उतरणार आहे.

अशी असेल टीम इंडियाची नवी जर्सी