इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडिया नव्या अवतारात

इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडिया नव्या अवतारात उतरणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडविरुद्धच्या वनडे आणि टी-२० सामने खेळणार आहे.

Updated: Jan 12, 2017, 03:26 PM IST
इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडिया नव्या अवतारात title=

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडिया नव्या अवतारात उतरणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडविरुद्धच्या वनडे आणि टी-२० सामने खेळणार आहे.

नव्या नेतृत्वासह नव्या जर्सीमध्ये टीम इंडिया या सीरिजमध्ये आपल्याला दिसणार आहे. ही नवी जर्सी नुकतीच लाँच करण्यात आलीये. बीसीसीआयने ट्विटरवरुन ही माहिती दिलीये.

बीसीसीआयने ट्विट केलेल्या या फोटोत भारतीय महिला आणि पुरुष संघातील क्रिकेटपटू आहेत. १५ जानेवारीपासून भारताची इंग्लंडविरुद्ध वनडे सीरिज सुरु होतेय. तीन सामन्यांची वनडे सीरिज असणार आहे तर तीन टी-२० सामने खेळले जाणार आहेत.