कोलकत्ता : बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर त्यांचे डोळे सुश्रुत आय फाउंडेशन अँड सिसर्च सेंटरला दान करण्यात आले आहे. रविवारी दालमिया यांचे कोलकता येथे निधन झाले, त्यांच्यावर नुकतीच हृद्य शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार दालमिया यांनी नेत्रहीन निर्मुलन संदर्भातील सामाजिक कार्यक्रमाची सुरूवात केली होती. क्रिकेट फॉर लाइफ बियॉन्ड डेथ ऑर चान्स ऑफ सेकंड इनिंग्स या थीमने ओळखले जाते. जगमोहन दालमिया यांची शेवटची इच्छा त्यांचे डोळे दान करणे ही होती.
सोमवारी दुपारी १२.४५ मिनिटांननी १० अलिपूर येथील निवासस्थानावरून दालमिया यांची अंत्ययात्रा सुरू झाली. इंडियन क्रिकेट टीमचे डायरेक्टर रवि शास्त्री, बीसीसीआयचे सेक्रेटरी अनुराग ठाकूर, सीईओ रत्नाकर शेट्टी सह अनेक अधिकारी दालमिया यांना श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित होते.
दालमिया यांच्या पार्थिवाला दुपारी १२.५० मिनिटांनी इडन गार्डन येथील सीएबीच्या ऑफिसमध्ये आणण्यात आले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.