कोलकता : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचे आज ( २० सप्टेंबर) रात्री सव्वा नऊच्या सुमारास निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते.
१७ तारखेला रात्री हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने येथील बी. एम. बिर्ला हार्ट रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.
गेल्या काही दिवसांपासून जगमोहन दालमियांची प्रकृती नाजूक होती. १७ सप्टेंबर रोजी रात्री त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना नऊच्या सुमारास बी. एम. बिर्ला हार्ट रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यांच्यावर उपचार सुरु होते.
दरम्यान, दालमिया यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी भारताचा माजी कप्तान सौरभ गांगुली, पश्चिम बंगालचे क्रीडामंत्री अरुप बिस्वास यांच्यासह बंगाल क्रिकेट बोर्डाच्या काही पदाधिका-यांनी बी. एम. बिर्ला हार्ट रिसर्च सेंटरमध्ये येऊन भेट घेतली होती. हार्ट रिसर्च सेंटरमध्ये जगमोहन दालमियांच्यासोबत त्यांचे पुत्र अभिषेक उपस्थित होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.