रिओ : भारताची बॅडमिंटनस्टार पी.व्ही सिंधूनं वर्ल्ड नंबर टू चीनच्या यिहान वँगचा धुव्वा उडवत दिमाखात सेमी फायनलमध्ये प्रवेश केला.
संधूनं वँगवर 22-20, 21-19 नं विजय साकारला. तिला चीनी ड्रॅगनचं आव्हान मोडित काढण्यासाठी अवघी 54 मिनिटं लागली. आता ऑलिम्पिक मेडलपासून सिंधऊ केवळ एक पाऊल दूर आहे.
सायना नेहवलानंतर ऑलिम्पिक सेमी फायनल गाठणारी ती दुसरी भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे. सेमी फायनलमध्ये सिंधूचा मुकाबला जपानच्या सहाव्या मानांकित नोझोमू ओकुहाराशी होणार आहे. 18 ऑगस्टला सिंधूची ही लढत रंगणार आहे.