मला माफ करा - बॉक्सर विकास कृष्णन

भारताचा बॉक्सर विकास कृष्णन यांनी म्हटलं आहे की, मी माफी मागतो, की आपल्या सर्वांना मी निराश केले आहे. माझी इच्छा होती भारतासाठी पदक जिंकू, मात्र ती पूर्ण करण्यात अपयश आलंय.

Updated: Aug 17, 2016, 08:17 AM IST
मला माफ करा - बॉक्सर विकास कृष्णन title=

रिओ : भारताचा बॉक्सर विकास  यांनी म्हटलं आहे की, मी माफी मागतो, की आपल्या सर्वांना मी निराश केले आहे. माझी इच्छा होती भारतासाठी पदक जिंकू, मात्र ती पूर्ण करण्यात अपयश आलंय.

कृष्णनच्या पराभवानंतर बॉक्सिंगमधूनही भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले आहे. उपांत्यपूर्व फेरीत कृष्णनला उझबेकिस्तानचा बॉक्सर मेलिकुझिव बेक्तेमीर याने ०-३ असे सहज पराभूत केले. 

आशियाई सुवर्णपदक विजेता भारताच्या कृष्णनने ७५  किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरी गाठून भारताला पदक मिळवून देण्याची आशा निर्माण केली होती. पण, बॉक्सिंगमध्येही भारताला अपयशालाच सामोरे जावे लागले. बॉक्सिंगमध्ये यापूर्वीच शिवा थापा, मनोज कुमार यांना पराभवाला सामोरे जावे लागलेले आहे.