'तिहार तुरुंगातच श्रीसंतला संपवण्याचा प्रयत्न झाला होता'

२०१३ साली उघडकीस आलेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील आरोपी आणि क्रिकेटर श्रीसंत याला जेलमध्येच संपवण्याचा प्रयत्न झाला होता, असा धक्कादायक दावा प्रसिद्ध मल्याळी गायक मधू बालकृष्णन यांनी केलाय. बालकृष्णन हे श्रीसंतच्या मोठ्या बहिणीचे पती आहेत. 

Updated: Feb 27, 2015, 05:15 PM IST
'तिहार तुरुंगातच श्रीसंतला संपवण्याचा प्रयत्न झाला होता' title=

कोची : २०१३ साली उघडकीस आलेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील आरोपी आणि क्रिकेटर श्रीसंत याला जेलमध्येच संपवण्याचा प्रयत्न झाला होता, असा धक्कादायक दावा प्रसिद्ध मल्याळी गायक मधू बालकृष्णन यांनी केलाय. बालकृष्णन हे श्रीसंतच्या मोठ्या बहिणीचे पती आहेत. 

 
श्रीसंत दिल्लीतील तिहारच्या तुरुंगात बंद असताना त्याच्या हत्येचा प्रयत्न झाला होता, असं बालकृष्णन यांनी म्हटलंय.  एका टीव्ही चॅनलशी बोलताना बालकृष्णन यांनी ' तिहारच्या तुरुंगात श्रीसंतच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. हत्येच्या आरोपाखाली तुरुंगातील एका दादा टाईप आरोपीनं श्रीसंतवर एक हत्यारानं हल्ला केला होता. दरवाज्याच्या बोल्टच्या साहाय्यानं त्या गुंडानं हे हत्यार बनवलं होतं. परंतु, केवळ सुदैव म्हणून श्रीसंतला काहीही झालं नाही' असं बालकृष्णन यांनी म्हटलंय. 
 
श्रीसंत तिहार तुरुंगात घडलेला हा प्रकार अद्याप विसरू शकलेला नाही. ही घटना तिहार जेलमध्ये घडली होती म्हणूनच श्रीसंतनं याची वाच्यता आणि तक्रार कुठेही केली नाही, असंही बालकृष्णन यांनी म्हटलंय. 

श्रीसंतला केवळ बळीचा बकरा बनवण्यात आल्याचं त्याचे कुटुंबीय मानतात, असं बालकृष्णन यांनी एका प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं. भारतीय क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू आयपीएल फिक्सिंग कांडात अपराधी आहेत, पण त्यांची नावं मात्र जाहीर करण्यात आली नाहीत. पण, श्रीसंतला केवळ संशयाच्या आधारावर दोषी बनवलं गेलं आणि अटक करण्यात आली, असंही ते म्हणतात.

श्रीसंत याला दिल्ली पोलिसांनी २०१३ साली मुंबईत अटक केली तेव्हा तो आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत होता. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.