अनिल कुंबळेनं केलेल्या त्या विश्वविक्रमाला 18 वर्ष पूर्ण

एका टेस्ट इनिंगमध्ये दहा विकेट घेण्याच्या अनिल कुंबळेच्या विक्रमाला आज 18 वर्ष पूर्ण झाली आहेत.

Updated: Feb 7, 2017, 09:00 PM IST
अनिल कुंबळेनं केलेल्या त्या विश्वविक्रमाला 18 वर्ष पूर्ण title=

मुंबई : एका टेस्ट इनिंगमध्ये दहा विकेट घेण्याच्या अनिल कुंबळेच्या विक्रमाला आज 18 वर्ष पूर्ण झाली आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत फक्त दोघांनाच हा पराक्रम करता आला आहे. दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानामध्ये कुंबळेनं वसीम अक्रमची विकेट घेऊन इतिहासाला गवसणी घातली.

18 वर्षानंतर कुंबळेनं या आठवणींना उजाळा दिला आहे. या मॅचमध्ये खेळण्याआधी मी विचारही केला नव्हता की मी इनिंगमध्ये 10 विकेट घेईन. माझं हे रेकॉर्ड उद्याही तुटेल किंवा ते तुटायला आणखी 10 वर्षही लागतील, असं कुंबळे म्हणाला आहे.

पाहा कुंबळेनं घेतलेल्या 10 विकेट