नवी दिल्ली : न्यूजीलंडमध्ये ११ व्या फलंदाजाने शानदार नाबाद १५० रन्सची खेळी केली. तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल, फ्रेडी वॉकर याचा याआधी सर्वाधिक स्कोर फक्त २५ रन होता. शिवाय शेवटच्या विकेटसाठी त्याने अनीस देसाईसोबत २२० रन्सची पार्टनरशिप केली. बे ऑफ प्लेंटी विरुद्ध हेमिल्टनच्या या खेळाडूने महत्त्वाच्या वेळी ही शानदार खेळी केली. हेमिल्टन संघाचा स्कोर 93/6 होता. नंतर स्कोर 189/9 होता.
शेवटच्या विकेटच्या रुपात बँटींग करण्यासाठी आलेल्या फ्रेडीने शेवटच्या विकेटसाठी 220 रन्सची पार्टनरशिप केली. फ्रेडीने याआधी ६ इनिंगमध्ये फक्त एकूण ५४ रन केले होते. फ्रेडीने 23 फोर आणि १ सिक्स लगावला होता. फ्रेडीने त्याच्या या इनिंगमध्ये 125 बॉलमध्ये १५० रन केले. फ्रेडीच्या या शानदार खेळीमुळे हेमिल्टनचा स्कोर 409/9 असा होता. फ्रेडी शिवाय अलावा देसाईने देखील दुसऱीकडे चांगली बॅटींग करत 231 बॉलमध्ये 165 रन केले. हा कारनामा सेडन पार्कपासून फक्त 5 किमी अंतरावर झाला. जेथे ऑस्ट्रेलिया आणि न्यूजीलंड यांच्यात तिसरी वनडे सुरु आहे.