अजिंक्य राहणे-राधिका विवाह बंधनात!

मराठमोळा भारतीय स्टार क्रिकेटर अजिंक्य राहाणे लग्नाच्या बेडीत अडकलाय. अजिंक्यनं त्याच्याच भागात राहणाऱ्या राधिकाशी लग्नगाठ बांधलीय.   

Updated: Sep 26, 2014, 05:38 PM IST


अजिंक्य - राधिका

नवी दिल्ली : मराठमोळा भारतीय स्टार क्रिकेटर अजिंक्य राहाणे लग्नाच्या बेडीत अडकलाय. अजिंक्यनं त्याच्याच भागात राहणाऱ्या राधिकाशी लग्नगाठ बांधलीय.   

हे अरेंज मॅरेज असल्याचं सांगण्यात येतंय. अजिंक्य आणि राधिका दोघेही महाराष्ट्रातलेच.... मुंबईचे! राधिका आणि अजिंक्य दोघेही मुंबईतल्या मुलुंडमध्येच राहतात.

पारंपरिक पद्धतीनं मोठ्यांच्या आशीर्वादानं राधिका आणि अजिंक्यनं एकमेकांना शेवटपर्यंत साथ देण्याचं वचन दिलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.