मुंबई : स्वित्झर्लेंडचा 17 ग्रँड स्लॅम विजेता रॉजर फेडररने ट्वीटरवर भारतीयांना विचारलं की, भारतात कुठे-कुठे फिरायला जाता येऊ शकतं, एवढंच नाही तर मला फोटोशॉपने फोटो बनवून पाठवा आणि मला दाखवा.
तेव्हा लोकांनी फेडररला माकडवाला बनून माकडाला नाचवायचाही सल्ला दिला आणि असं चित्र फोटोशॉपमध्ये बनवून पाठवलं.
मिशेल फ़्रेंकलिन यांनी ट्वीट केलंय. गंगेत डुबकी लावणं विसरू नको. भारतीय टेनिस प्रशंसकांनी पाठवलेले अनेक फोटो फेडररने रिट्वीट केले आहेत. रॉजर इंटरनॅशनल टेनिस प्रीमिअर लीगमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात येतोय.
फेडररने ट्वीट केलंय, दिल्लीत 7 आणि 8 डिसेंबर रोजी होणाऱ्या सामन्यात खेळण्यासाठी मी अत्यंत उत्साही आहे.
भारतात फिरण्यासाठी कोणती चांगली ठिकाणं आहेत, यावर फेडररला ट्वीटरवर अनेक सल्ले देण्यात आले. यावर अनेक सल्ले देण्यात आले आहेत, यावर रॉडरने रिट्वीट केले आहेत. जे प्राईस यांनी ताजमहल जाण्याचा सल्ला दिला. अंबर यांनी फ़ेडररला ट्वीट केलंय : भारतमध्ये मेंहदी लावणे विसरू नका.
आयटीपीएल या वर्षी 28 नोव्हेंबर पासून 13 डिसेंबरपर्यंत नवी दिल्ली, सिंगापूर, मनीला आणि दुबईमध्य़े खेळवली जाईल. टुर्नामेंटमध्ये एकूण 24 मॅच राऊंड रॉबिन आधारावर खेळले जातील आणि फायनल 13 डिसेंबर रोजी होईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.