प्रणव धनावडेला एअर इंडियाची ऑफर

कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये १००० पेक्षा अधिक धावा बनविणारा जगातील पहिला फलंदाज प्रणव धनावडे याला एअर इंडियाने आपल्या टीममध्ये सामील होण्याची ऑफर दिली आहे.

Updated: Jan 8, 2016, 02:27 PM IST
प्रणव धनावडेला एअर इंडियाची ऑफर  title=

मुंबई : कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये १००० पेक्षा अधिक धावा बनविणारा जगातील पहिला फलंदाज प्रणव धनावडे याला एअर इंडियाने आपल्या टीममध्ये सामील होण्याची ऑफर दिली आहे.

 

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहिती नुसार विविध क्षेत्रातील प्रतिभावंत तरूणांना उत्तेजन देण्याच्या धोरणाचा भाग म्हणून १५ वर्षीय या क्रिकेटरला एअर इंडियाने हा प्रस्ताव दिला आहे. 

एअर इंडियाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही काल प्रणवच्या कुटुंबियांना ही ऑफर दिली आहे. स्कॉलरशीपच्या आधारावर एअर इंडियाशी संलग्न होण्यास सांगितले आहे. 

ऑटो रिक्षा चालकाच्या या मुलाने नुकत्याच १००९ धावा केल्या होत्या.