सचिनकडून प्रणव धनावडेला स्वत:च्या स्वाक्षरीची बॅट

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने प्रणव धनावडेला स्वत:ची बॅट सही करून भेट दिली आहे. नाबाद १००९ धावांचा विश्वविक्रम प्रणवने केला आणि लगेच सचिनने ट्विटरद्वारे अभिनंदन केलं, तसेच तुला नवीन शिखरं गाठायची आहेत, असा सल्लाही सचिनने दिला.

Updated: Jan 7, 2016, 09:05 PM IST
सचिनकडून प्रणव धनावडेला स्वत:च्या स्वाक्षरीची बॅट title=

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने प्रणव धनावडेला स्वत:ची बॅट सही करून भेट दिली आहे. नाबाद १००९ धावांचा विश्वविक्रम प्रणवने केला आणि लगेच सचिनने ट्विटरद्वारे अभिनंदन केलं, तसेच तुला नवीन शिखरं गाठायची आहेत, असा सल्लाही सचिनने दिला.

महाराष्ट्र सरकारनेही त्याच्या कोचिंगचा शिक्षणाचा खर्च उचलण्याची तयारी केली आहे. तसेच प्रणवला मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून स्कॉलरशिप दिली जाणार आहे. आता सचिननेही स्वाक्षरी असलेली बॅट प्रणवला भेट दिली आहे. बीसीसीआयने ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे.